डौर फाटा येथे कुंडलवाडी पोलिसांनी गुटखा पकडला◆८२ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुंडलवाडी :- शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोटारसायकल वरून डौर फाटा मार्गे नायगाव कडे जात असताना कुंडलवाडी पाेलिसांनी पकडले असून मोटारसायकल सह ८२ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई दि.१८ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता केली आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ माधव पाटील, रामेश्वर पाटील, रवि देशमुख यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून दि.१८ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता डौर फाटा मार्गे नायगाव कडे जात असलेली मोटरसायकल ला थांबवून तपासणी केली.
यात मानवी आरोग्यास हानिकारक असलेला शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला, सुगंधित गुटखा,तंबाखुजन्य पदार्थ ३२ हजार ६७१ रुपयांघा तसेच ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकुण ८२ हजार ६७१ रुपयांचा जप्त केला असून आरोपी श्रीनिवास भाऊराव देगावे (रा.सालेगाव ता.धर्माबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,भोकर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ माधव पाटील, रामेश्वर पाटील, रवि देशमुख यांनी केली आहे.
गत चार महिन्यापूर्वी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रूजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या कार्यकाळात सातत्याने अवैध धंद्यावर कारवाया होत असल्याने बऱ्याच प्रमाणात अवैध धंद्याला आळा बसला आहे.