शिवसेना शिंदे गट ओबीसी व्हीजे एनटी ८९ नायगाव विधानसभा अध्यक्षपदी पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांची नियुक्ती
New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- शिवसेना मूख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सनमाननिय एकनाथ भाई शिंदे साहेब शिवसेनेचे सचिव संजय भाऊ मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी चे प्रदेशाध्यक्ष तथा आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे ओबीसी ची बुलंद तोफ आदरणिय बाळासाहेब किसवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिडको येथे जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन व नवीन पदाधिकारी यांची मुलाखती व निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांची तर नांदेड दक्षिण उपाध्यक्ष पदी बालाजी आचमे यांची व सहसचिव पदी आशोक दर्शने बळीरामपूर सर्कल प्रमुख चंद्रकांत म्यानेटवार, विष्णूपूरी गण प्रमुख पदी दत्ता पातरपल्ले, खूपसरवाडी शाखाप्रमुख पदी भिमाशंकर मंडले यांची निवड करून जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांनी आदि पदअधिकारी यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.