नांदेडच्या पालकमंत्री पदी ना.अतुल सावे यांची नियुक्ती
प्रकाश महिपाळे
नायगाव : अनेक दिवसापासून निराधार असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालक मिळाले असून. शनिवारी सायंकाळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नांदेडचे पालकमंत्री म्हणून राज्याचे ओबीसी व दुग्धव्यवसाय मंत्री असलेले अतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागली. तोपर्यंतच मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी आमदारांनी राजकीय वजन वापरले तरी अनेकांना मंत्रीपदाची हुलकावणी मिळाली तर अनेक दिग्गज आमदारांना कमी दर्जाचे खाते मिळाले होते. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली असली तरी मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री मिळेल याकडे मंत्र्याचे लक्ष लागले होते.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि पालकमंत्री जाहीर करण्यासही विलंब होत असल्याने मंत्र्यात अस्वस्थता वाढत चालली असतांनाच शनिवारी सायंकाळी जिल्हाचे पालकमंत्र्याची यादी जाहीर केली. यात नांदेडचे पालकमंत्री म्हणून राज्याचे ओबीसी व दुग्धव्यवसाय मंत्री असलेले अतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येवू नये अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दुर ठेवण्यात आले तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालण्याचे पालकत्व सोपवण्यात आल्याने नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.