कुंडलवाडी चा आठवडी बाजार उद्या शुक्रवारी नियमितपणे भरणार
◆जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची माहिती

कुंडलवाडी :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दि.३० जुलै रोजी आदेश काढून दि.१ आँगस्ट २०२५ रोजी नांदेड शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येत असल्याने शुक्रवार दि.१ आँगस्ट रोजी भरणारे आठवडी बाजार हे शनिवारी भरण्यात यावेत असे आदेश दिले होते.
मात्र कुंडलवाडी शहरात शुक्रवारी दि.१ आँगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे कुंडलवाडी शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार भरणार की बंद राहणाऱ याबाबत संभ्रमावस्था होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना संपर्क साधला असता त्यांनी दि.१ ऑगस्ट रोजी कुंडलवाडी शहरात शुक्रवार दि.१ आँगस्ट रोजी जयंती नसेल तर शुक्रवारचा आठवडी बाजार भरणार असे स्पष्ट केले आहे.
यामुळे शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याबाबत ग्राहक व व्यापाऱ्यातील संभ्रमावस्था दुर झाली आहे. दि.१ ऑगस्ट रोजी कुंडलवाडी शहरात साठे जयंती साजरी होत नसल्याने शुक्रवार चा आठवडी बाजार भरण्यास काही हरकत नाही असे पत्र कुंडलवाडी पोलीस ठाण्यातर्फे नगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहे.



