ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १० एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा

◆चेअरमन सुनील बेजगमवार यांची माहिती

कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची विशेष सर्वसाधारण सभा दि.१० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली असून या विशेष सभेस संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनिल बेजगमवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७६ (१) अन्वये चेअरमन सुनिल रमाकांत बेजगमवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. सर्वसाधारण सभा बोलवण्यात यावी यासाठी संस्थेच्या ३७८ सभासदांनी चेअरमन यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली होती.

या विशेष सभेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड या संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षा करीता संचालक मंडळाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार, मतदार, सूचक व अनुमोदक होणेसाठी प्रतिनिधीस अधिकार देणे बाबत व इतर विषय मा.अध्यक्ष साहेबाच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर विचार विनीमय करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संस्थेच्या सभासदांनी या विशेष सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन सुनील बेजगमवार यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker