ताज्या बातम्यानांदेडनायगांव

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एल.सी.बी ची जुगार अड्डयावर कारवाई : ठाणेदाराचे पितळ उघडे

प्रकाश महिपाळे

नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरा शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारुन चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले तर चार जन पळून गेले. त्यामुळे आठ जुगाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून. 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पितळ उघडे पडले असल्याने या ठाण्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.

रामतीर्थ येथील मुख्य रोडवरील एटीएम चोरीतील 20 लाखाची रक्कम चोरी गेल्या प्रकरणाचा आजपर्यंत तपास तर लागलाच नाही पण इतर चोऱ्यांचा तपास लावण्यात रामतीर्थ पोलीसांना स्वरस्य दिसत नाही. त्याचबरोबर अवैध धंद्यांनाही ठाणेदारच प्रोत्साहन देत असल्याने अवैध धंद्यानी डोके वर काढले आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरा शिवारातील कँनालच्या बाजूस तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्याने कंधार भागात निघालेले पोलीस उपनिरीक्षक अशिष बोराटे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोहेका दासरवार, पोना शेळके, पोकों वादगीरवाड, चालक देवकते अदिंच्या पथकाने रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्चा वळवला. जुगार अड्ड्यावर धाड मारली. यावेळी कँनालच्या बाजुस मोकळ्या जागेत काही इसम गोलाकार बसुन पत्यावर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित असताना दिसुन आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आल्याची चाहुल लागताच जुगाराचे साहित्य जागीच ठेवून पळ काढला आम्ही स्टाफच्या मदतीने पाठलाग करुन चार इसम नामे, 1) राहुल लक्ष्मण पांचाळ यय-34 वर्षे व्यदसाय मजुरी रा.बेळगे नगर ता.नायगांव 2) रामदास श्रीधर पांचाळ यय 32 वर्षे व्य.शेती, हिप्परगा ता.नायगांव 3) विश्वनाथ गंगाधर गोरे वय 30 वर्ष व्य. मजुरी, रा.ताकबीड, ता.नायगांप 4) शुभम गंगाजीराव ताटे वय 27 वर्षे व्य. शेती रा.मुगाव ता.नायगांव असे सांगितले. त्या इसमाची व जागेची झडती घेतली असता खालीप्रमाणे जुगाराचे साहित्य व नगदी 52 हजार 500 रुपये मिळुन आले.

मुद्देमालाची खात्री व पडताळणी करुन पंचासमक्ष जागीच पंचनामना करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्याकडून पळून गेलेल्या जुगाऱ्याबद्दल विचारपूस केली असता. 1.सुनिल जाधव रा.कांडाळा ता नायगांव 2.प्रकाश कांबळे रा कांडाळा ता नायगांव 3 साईनाथ कदम रा.कांडाळा ता.नायगांव 4.बालाजी कोटुरवाड उर्फ सावकार रा.कांडाळा ता.नायगांव असे असल्याचे सांगितले.

ताब्यात असलेल्या व पळून गेलेल्या वरील आठ आरोपींच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker