शिवसेना शिंदे गट मुखेड एस.सी.विभाग शहर प्रमुख पदी प्रकाश गायकवाड व होनवडज गण सर्कल प्रमुख पदी सुनील कांबळे यांची निवड

जयवर्धन भोसीकर
मुखेड – आज मुखेड येथे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव श्री बालाजीराव खतगावकर यांच्या मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभुराजे देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते माजी खासदार श्री हेमंत भाऊ पाटील नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, एससी एसटी ओबीसी जिल्हाप्रमुख मंगेश कदम, आनंदराव बोंढारकर, माजी आमदार सुभाष साबणे, गंगाधर बडूरे, महिला जिल्हाप्रमुख सौ वनमाला राठोड,मुखेड तालुकाप्रमुख बालाजी पाटील कमलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळेस प्रकाश दिगंबरराव गायकवाड यांची शिवसेना शिंदे गट मुखेड एस सी मागासवर्गीय विभागाच्या शहर प्रमुख पदी निवड जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी वरील मान्यवराच्या उपस्थितीत हस्ते नियुक्ती केली. व होनवडज सर्कल प्रमुख पदी सुनील देवबा कांबळे यांची पण या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी मान्यवर मंडळी सह मोठा जन समुदाय उपस्थित होता.