ताज्या बातम्यानांदेडनायगांव
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…
दिपक गजभारे
नांदेड :- वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्यावतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दि. १ जानेवारी रोजी सकाळी ६:३० वाजता वसरणी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची सुरूवात महादेव मंदिर वसरणी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – नवीन कौठा – जुना कौठा – महात्मा फुले चौक वसरणी सुजाता बौद्ध विहार वसरणी येथे समारोप होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यास प्रथम, द्वितीय व तृतीय असे पारितोषिक असून अनुक्रमे ३ हजार रूपये, २ हजार रूपये व १ हजार रूपये देण्यात येणार आहेत. तसेच ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात विभागली जाईल. सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत- जास्त शहरातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शुध्दोधन कापसीकर यांनी केले आहे.