“नाफेड” वर सोयाबीनची खरेदी सुरळीत करा-खा.रविंद्र चव्हाण
जुने सोयाबीन न घेणार्या ग्रेडरला सुनावले!
प्रकाश महिपाळे
नायगाव : वारंवार होणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांची फसवणूक न करता नाफेड केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरळीत करावी, अशा सूचना खासदार रवींद्र चव्हाण यांनी नाफेड केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.
प्रथाशक्ती फॉर्मर प्रोड्युसर व एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने जय योगेश्वर अॅग्रो फार्मर प्रोड्युसर नरसी रोड लोहगाव ता.बिलोली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर खा.रवींद्र चव्हाण यांनी अचानक भेट देवून खरेदी प्रक्रियेची पाहणी केली.
केंद्रावरील ग्रेडर, शेतकरी, कामगार यांच्याशीही चर्चा करून त्यांनी माहिती घेतली. शेतकर्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळण्यासाठी हे केंद्र सुरू केले आहेत, त्याची योग्य ती अंमलबजावणी करावी, अशा सूचना खा.चव्हाण यांनी दिल्या. मागील वर्षी सोयाबीनला भाव नसल्यामुळे अनेक शेतकर्यांनी आर्थिक अडचण असताना सुद्धा भाव वाढेल या अपेक्षेने व्यापार्यांना सोयाबीन न देता तसाच ठेवला.
यावर्षी तरी सोयाबीनला योग्य भाव मिळेल यासाठी शेतकरी जुने सोयाबीन नाफेड अंतर्गत खरेदी केंद्रावर घेऊन येत असताना शासनाच्या कुठल्याही सूचना नसताना जुने सोयाबीन खरेदीस नकार दिला जात असल्याची बाब लक्षात येताच. खा.रवींद्र चव्हाण यांनी याप्रश्नी ग्रेडरला धारेवर धरून जुने सोयाबीन घेण्याच्या सूचना दिल्या.
वजन काट्याच्या संदर्भातही शेतकर्यांची फसवणूक होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे त्यांनी सूनावले. केंद्रावर खा.रवींद्र चव्हाण यांनी अचानक भेट दिल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, जिल्हा प्रवक्ते दिलीप पाटील पांढरे, व्यंकट नायनवड मामा यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.