शंकरनगर येथे बस उभी करण्याची अनेक बस वाहकांना अलर्जी असल्याने प्रवाशांची गैरसोय
मोरे मनोहर
किनाळा :- हात दाखवा गाडी थांबवा असे शासनाचे धोरण असले तरी हात दाखवूनही नव्हे तर चक्क बस स्थानकावर देखील बस गाडी उभा न करता बसेस धावतात याही पुढे जाऊन बस मध्ये असलेला प्रवासी बस उभी करा आमचे नातेवाईकांना बसमध्ये यायचे आहे असे सांगितले तरी देखील बस बस स्थानकावर उभा न करता धावणाऱ्या बसेसच्या वाहकांना बस स्थानकावर गाडी उभा करण्याची ऍलर्जी आहे का असा प्रश्न प्रवासी वर्गात पडला असून अशा बस स्थानकावर बस उभा न करता जाणाऱ्या बसेसच्या वाहकावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देउन योग्य ती कारवाई करतील का असा प्रश्न पडला आहे.
सविस्तर माहिती अशी की नांदेड आगाराच्या नांदेड कडून देगलूर कडे येणाऱ्या आणि देगलूर आगाराच्या देगलूर कडून नांदेड कडे जाणाऱ्या बसेस शंकरनगर येथील बस स्थानकावर उभा न करताच वारंवार धावत असल्याने अनेक प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड कडून देगलूर कडे येणाऱ्या सकाळी सहा ते दहा पर्यंतच्या आणि सायंकाळी देगलूर कडून नांदेड कडे जाणाऱ्या तीन ते पाच पर्यंतच्या बसेस एक ते दोन बसेस सोडले तर बाकी जलद व अडणरी अशा सर्व बसेसला शंकरनगर येथे बस थांबा असताना अनेक वेळा अनेक बसेस शंकरनगर येथे बस उभी न करता जात असल्याने सकाळच्या वेळी बसने येणारे अनेक वृत्तपत्रांची पार्सल बसमध्ये असताना देखील बस उभी न करता जात असल्याने अनेक वेळा पेपर देखील मिळत नाहीत.
शंकरनगर येथे बस थांबा असताना देखील बस उभा न करता वांरवार जाणाऱ्या बसच्या वाहका विरुद्ध वरिष्ठ अधिकारी लक्ष देउन बसमध्ये रिकाम्या सीटा असताना प्रवासी हात करूनही प्रवाशांना गाडी उभा न करणाऱ्या मस्तवाल वाहकांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून केल्या जात आहे.