ताज्या बातम्यानांदेडबिलोली

आ.जितेश अंतापुरकर यांच्या शुभेच्छा बँनरवरून कुंडलवाडी भाजपात गटबाजी चे दर्शन

◆ शुभेच्छा बँनरवरून सोसायटीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांचा फोटो गायब ◆नागरिकांमध्ये चर्चेला उधान

कुंडलवाडी :- कुंडलवाडी भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणी देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आ.जितेश अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ३० डिसेंबर रोजी शुभेच्छा बँनर लावण्यात आले आहेत. या बँनरवरून सोसायटीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांचा फोटो गायब असल्याने भारतीय जनता पक्षातील गटबाजी चे दर्शन होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीपुर्वी एप्रिल मध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचा हाथ सोडून भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. अशोकराव चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणातही अनेक मोठे बदल झाले. कुंडलवाडी सोसायटीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हेही आपल्या समर्थकासह काँग्रेस पक्ष सोडून भाजपात दाखल झाले.

सुनील बेजगमवार यांचा भाजप पक्ष प्रवेश शहरातील भाजप पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला. याची चर्चा त्यावेळेस झाली. नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार हे सोसायटी निवडणूक भाजपकडून तर माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी काँग्रेस पक्षाकडून सोसायटी निवडणूक लढविली होती.

एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार व सुनील बेजगमवार हे एकाच पक्षात आल्यामुळे दोघेही एकमेकांना किती प्रमाणात जुळवून घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच नुकतीच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीत दोघांनीही एकत्रित शहरात मतदारांच्या भेटी घेत भाजप उमेदवारांचा प्रचार केला. याबाबत चे फोटो ही सोशल मिडीयात प्रसिद्ध झाले होते.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुक पार पडली.यात भाजपचे उमेदवार जितेश अंतापुरकर हे निवडून आले. आ.अंतापुरकर या़चा ३० डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने भाजप पक्षाकडून मुख्य बाजारपेठेसह विविध भागात शुभेच्छा बँनर लावण्यात आले आहेत. या शुभेच्छा बॅनर वरून सोसायटीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हे भाजप पक्षात असतानाही त्यांचा फोटो गायब असल्याने शहरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

शहरातील जवळपास सर्व भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे फोटो शुभेच्छा बॅनर आहेत पण सोसायटी चेअरमन सुनील बेजगमवार यांचा व त्यांच्या समर्थकांचा फोटो मात्र शुभेच्छा बॅनर वरून गायब आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशामुळे डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार व सुनील बेजगमवारर यांनी शहरात एकत्र प्रचार केला. पण निवडणुका संपल्यानंतर मात्र दोघात जमत नसल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून याचे दर्शन आ.जितेश अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनर वरून गटबाजी स्पष्ट असल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उत आला आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आ.अंतापुरकर यांच्या शुभेच्छा बॅनर वरून भाजप पक्षाअंतर्गत असलेली गटबाजी उघड झाली असली तरी आगामी काळात नगरपालिका निवडणूक होणार असल्याने भाजप अंतर्गत असलेली गटबाजी नगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम करते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. आ.अंतापुरकर यांच्या शुभेच्छा बॅनर वरून फोटो गायब असल्याने सोसायटी चेअरमन सुनील बेजगमवार हे आगामी काळात कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा कुंडलवाडी शहरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker