नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ अध्यक्ष पदी लक्ष्मण चन्नावार व युवक अध्यक्ष पदी कैलास रामदिनवार
तर महिला संघटनेच्या अध्यक्षपदी अनुसया नर्तावार यांची बिनविरोध निवड
रामप्रसाद चन्नावार
नायगाव :- अखिल भारत पद्मशाली संघम, हैद्राबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा यांच्या घोषित कार्यक्रमानुसार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी मार्कंडेयश्वर मंदिर नायगाव येथे शंकरराव गोंटलावार यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली महासभेचे निवडणूक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुका प्रौढ संघटना – महिला संघटना व युवक संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नायगाव तालुका प्रौढ संघटनेचे अध्यक्ष म्हणून लक्षमण विठ्ठलराव चन्नावार व नायगाव तालुका युवक संघटनेचे अध्यक्ष कैलास लक्ष्मणराव रामदिनवार, नायगाव तालुका महिला संघटनेच्या अध्यक्ष म्हणून अनुसया संभाजी नर्तावार. यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून धनंजय गुम्मलवार, विजय अण्णा वडेप्पली, शिवशंकर सिरमेवार, गोविंद रामदिनवार, भारत राखेवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष व निवडणूक अधिकारी. सर्व समाज बांधव यांच्या वतीने नवनियुक्त तिन्ही अध्यक्षाचा शाल श्रीफळ व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकरराव गोटलावार, श्री.माधवराव नर्तावार, श्री.गोविंदराव दुसेवार, श्री.माधवराव बिरेवार, श्री.राजेश्वर बोटलावार, पत्रकार श्री.रामप्रसाद चन्नावार, श्री.निलेश बिरेवार, साईनाथ चन्नावार, श्री.साईनाथ आलेवार, श्री.लक्ष्मीकांत दुसेवार, श्री.मोहन जोगेवार, श्री.गजानन गुरुपवार, श्री.व्यंकट चिलकेवार, श्री.मारोती कोंपलवार, श्री.लक्ष्मण चन्नावार, श्री.विठ्ठल गोटलावार.
श्री.लक्ष्मण ताटेवार, श्री.नरसींग गोटलावार, श्री.दत्ता म्यानेवार, श्री.गोपीनाथ आंबटवार, श्री.हानमंत चिलकावार, श्री.व्यंकटेश सब्बनवार, श्री.आनंद गुरुपवार, श्री.बालाजी वंगावार, श्री.शिवाजी रामदिनेवार, श्री.प्रकाश लखपत्रेवार, श्री.शंकर रामदिनवार, श्री.प्रल्हाद वंगरवार, श्री.यादव कोकुलवार, श्री.चंद्रकांत लखपत्रेवार, श्री.विलास मध्यमवार, श्री.गंगाराम गोणेवार, श्री दत्ता सांगवीकर, श्री.शंकर माडेवार, श्री.दिगांबर यलगंदवार, साईप्रसाद चन्नावार, श्री संजय गुजलवार, सौ.मिराताई सब्बनवार, सौ.मिनाक्षी आलसटवार, सौ.उशाताई चरपीलवार, सौ.गोदावरी आलसटवार.
सौ.संगीता वंगावार, सौ.मिनाताई ताटेवाड उपस्थित होते व वरील अध्यक्षांची निवड झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.रविंद्र पाटील चव्हाण, तसेच नायगाव नगरपंच्यातचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी तिन्ही अध्यक्षाचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष लक्षमण चन्नावार, कैलास रामदिनवार यांचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण व उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या वतीने सत्कार करुन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.