कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांशी भवितव्यातही ऋणानुबंध कायम राहणार – प्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले
◆कुंडलवाडी येथे वीज कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले व जुबेर शेख यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

कुंडलवाडी :- गत पाच वर्षांपूर्वी कुंडलवाडी येथील वीज वितरण कार्यालयात प्रधान तंत्रज्ञ म्हणून रुजू झालो.कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांची वीज कंपनीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. गत पाच वर्षे सेवा करीत असताना कधी गेले हे कळालेच नाही. कुंडलवाडी करांनी मला भरभरून प्रेम दिले.कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांचे माझ्यावर दाखवलेलै प्रेम मी कधीही विसरणार नसून ऋणानुबंध भविष्यातही कायम ठेवणार असल्याची भावनिक प्रतिक्रिया प्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले यांनी निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
येथील वीज वितरण कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञान व्ही एन गुडले यांची बा-हाळी येथे प्रशासकीय बदली झाल्याने तसेच धर्माबाद उपविभागातील लिपिक जुबेर शेख यांची देगलूर येथे बदली झाल्याने त्यांचा दोघांच्याही बदली निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम दि.७ सप्टेंबर रोजी कुंडलवाडी येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार,बाजार समितीचे सभापती बाबाराव भाले, माजी नगरसेवक दत्तात्रय -याकावार,माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बोधनकर, पत्रकार गणेश कत्रूवार,पत्रकार कुणाल पवारे, मुकेश जोशी आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रधान तंत्रज्ञान कुठले यांचा वीज वितरण कंपनी कार्यालय कुंडलवाडी येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार तसेच श्री गणेश मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
धर्माबाद उपविभागाचे लिपिक जुबेर शेख यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कुंडलवाडी शाखेत नव्यानेच रुजू झालेले प्रधान तंत्रज्ञ एन.जी.घोरबांड, वरिष्ठ तंत्रज्ञ एस.एस.फुलारी व ए.एस.बल्केवाड हे कुंडलवाडी शाखेत नव्यानेच रुजू झाल्याने त्यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नरेश बोधनकर, कुणाल पवारे, गणेश कत्रूवार, मुकेश जोशी, साईनाथ उत्तरवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कुंडलवाडी शहर परिसरातील अनेक नागरिकांनी प्रधान-तंत्रज्ञ व्हि.एन.गुडले यांचा शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टुवार, पुंडलिक कांबळे, राजेश्वर कोलंबरे, बए.के.उषलवार, आर एल तेलकेश्वर, डी.डी.पवार, डी व्हीं शिरशेटवाड, आर.एस. तेलंगे, आर.एल.वडनावार, डी.एन.देवनपल्ले, मल्लेश मोतकेवार, हनमलू नागुलवार, योगेश शेरियाल, महेश चौधरी, शंकर संगेवार, रवी कोरेवार, गोविंद गवळे, टी.बी. गिरे, एस.आर. मदिकुंटावार, एम.पी.अटकळीकर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ कांबळे यांनी तर आभार संदीप फुलारी यांनी मानले यावेळी मोठ्या प्रमाणात शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.