ताज्या बातम्यानांदेडनायगांव

विभागीय आयुक्त कार्यालयातील पथकाकडून नांदेड जिल्ह्यातील रोहयोच्या कामाची तपासणी : तपासणी पथक नायगावलाही येणार ?

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नांदेड जिल्ह्यातील पुर्ण व चालू असलेल्या रोहयोच्या कामाची तपासणी करण्यासाठी दि. 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयातील पथक येणार आहे. सदरचे पथक नायगाव तालुक्यातील काही कामांची तपासणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हे तपासणी पथक नायगाव तालुक्यात येवू नये यासाठी पंचायत समिती स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मोठ्या प्रमाणात बोगस कामे करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत, रोजगार सेवक, पंचायत समिती, तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रमाधिकारी यांच्या संगणमताने रोहयोच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला. नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी रोहयो आयुक्तांचे आदेश डावलून तालुक्यातील बळेगाव, चारवाडी, इकळीमाळ, हिप्परगा जाने. हुस्सा, कहाळा खु, कोठाळा, मांजरम, मनूर त.ब., मरवाळी तांडा, परडवाडी, रुई, सालेगाव, सांगवी, सोमठाणा, सुजलेगाव, तलबीड व टेंभुर्णी अदि गावात मातोश्री पांदन रस्ता, सिमेंट रस्ते, खडीकरण, पेव्हर ब्लाक कामे सुरु करण्यास पंचायत समितीच्या स्तरावरुन समंती दिली.

सदरचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबधीतांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे नाटक करण्यात आले. नायगाव तालुक्यातील मनरेगाच्या बोगस कामाची किर्ती रोहयो आयुक्त नागपूर व रोहयो सह आयुक्त छत्रपती संभाजी नगर पर्यंत पोहचली आहे.

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रोहयोच्या कामाची तपासणी करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील पथक दि. 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान नांदेड जिल्ह्यात येणार आहे. येणाऱ्या पथकाचा दौरा नायगाव तालुक्यातही होणार असून काही कामांची तपासणी करणार आहे. त्यामुळे मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार केलेल्यांचे धाबे दणाणले असून तपासणी होवून बोगसगिरी उढड झाल्यास अनेकांची विकेट पडण्याची शक्यता असल्याने सदरचे पथक नायगावला येवू नये यासाठी पंचायत समितीच्या स्तरावरुन जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker