शंकरनगर -जिगळा डांबरीकरण रस्ता कामाचे आ.जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

किनाळा (मोरे मनोहर) :- शंकरनगर पासून ते जिगळ्या पर्यंत असलेला रस्ता अनेक वर्षा पासून अतिशय खराब झालेला होता त्यामुळे या रस्त्यावरच असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय आणि रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र या बरोबरच रामतीर्थ व जिगळा येथील नागरिकांना ये- जा करण्यासाठी एकमेव रस्ता असल्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी अनेक नागरिकांनी अनेक वर्षापासून केली जात होती या गोष्टीची दखल देगलूर बिलोली विधानसभेचे विद्यमान आमदार जितेस रावसाहेब अंतापुरकर यांनी घेऊन हा रस्ता मंजूर करून घेतला आणि 6 जानेवारी रोजी या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा आ.जितेश अंतापुरकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे.
शंकरनगर ते जिगळा हा सुमारे दोन किलोमीटर असलेला रस्ता अतिशय खराब झाल्याने या रस्त्यावरच असलेल्या रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना व जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तर जिगळा व रामतीर्थ येथील नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागायची.
या रस्त्यावरील झालेल्या खड्डयामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन अनेक सामान्य नागरिक जखमी झाले मात्र या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात होता.हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी जिगळा आणि रामतीर्थ येथील नागरिकांनी केली असता त्यांच्या या मागणीची दखल घेऊन देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेस रावसाहेब अंतापुरकर यांनी शंकरनगर ते जिगळा सुमारे दोन किलोमीटर अंतराचा असलेला रस्ता मंजूर करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून हा अत्यंत महत्त्वाचा असलेला डांबरीकरण रस्ता मंजूर करून घेतले.
शंकरनगर ते जिगळा हा मंजूर करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणरावजी ठक्करवाड, माणिकराव लोहगावे, डॉ.कासराळीकर, रामतीर्थ नगरिचे सरपंच प्रतिनिधी हणमंतराव पाटील तोडे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, उपसरपंच मुरलीधर पाटील देगलूरे, लक्ष्मण पाटील देगलुरे, सुधाकर पांचाळ, चेअरमन शेषराव पाटील रोकडे, संतोष पाटील भक्तापुरे, आबाराव संगनोड, श्याम तोडे, ब्रह्मा कांबळे, बालाजी तोडे, सचिन वाघमारे, व गावकरी मंडळी उपस्थित होते.