किनाळा येथील पाच वर्षांच्या आमाण शेख या चिमुकल्या बालकाने रमजान रोजा केला पुर्ण

मोरे मनोहर
किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथील आमाण यादुल शेख या चिमुकल्या पाच वर्षीय मुलाने भर उन्हाळ्याच्या दिवसात रमजान महिन्यातील रोजा धरून रोजाच्या नियमाचे तंतोतंत पालन करत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील रोजा पूर्ण केला.
रोज्याच्या महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात अनेक जण उपवास करतात. एकदा उपवास धरल्यानंतर सायंकाळची नमाज अदा होईपर्यंत पाण्याचा थेंबही घेतल्या जात नाही यावर्षी उन्हाची तीव्रता खूप असताना पाण्यासाठी अनेकांचा जीव कासावीस होत आहे त्यामुळे अनेकांना रोजाचा हा उपवास करणे जमत नाही.
यावर्षी रमजान महिन्यात अतिशय कडक ऊन असल्याने रोजाच्या या महिन्यात अनेकांना या प्रचंड उणाच्या तीव्रतेने पाणी पिण्यासाठी रोजा सोडण्याची वेळ येत असताना किनाळा तालुका बिलोली येथील आमाण यादुलसाब शेख या चिमुकल्या पाच वर्षीय मुलाने भर उन्हाळ्याच्या दिवसात रमजान महिन्यातील हा रोजाच्या महिन्यातील सर्व नियम पूर्ण करत रोजा धरून पूर्ण केले.
चिमुकल्या आमान यादुलसाब या मुलाने पहाटे पाचच्या आत उठून नित्य नियमाप्रमाणे रोजा धरून अखंडितपणे दिवसभराचा रोजा पूर्ण केला.