ताज्या बातम्यानांदेडनायगांव
नायगाव येथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : सध्याच्या अधुनिक युगात कोणत्याही क्षेत्रात महिला या मगे नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकुशलतेने बौध्दिक पातळीवर काम करुन अटकेपार यश मिळवलेले सर्वत्र दिसत आहे.
त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यातील बिट जमादार साई सांगवीकर यांनीही ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महिला दिनाच्या सत्कार व सन्मान केला.
यावेळी महिला पोलीस अमलदार मीरा मेंडके मॅडम, चोपवाड मॅडम, वर्षा गायकवाड मॅडम, सुरेखा रॅपनवाड मॅडम यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, पी एस आय कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल साई सांगवीकर, बाबू चरकुलवार शंकर पवार व बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती.