उमरीताज्या बातम्यानांदेड

गोरठा येथे खून केलेल्या दोन आरोपींना अटक ; अनैतिक संबंधातून खून उमरी पोलिसांची कारवाई

New Bharat Times नेटवर्क

उमरी :- उमरी तालुक्यातील गोरठा शिवारात 25 ते 35 वयोगटातील पुरुष जातीच्या एका प्लास्टिकच्या टाकीत त्यात ज्वलनशील पदार्थ टाकून दि.१२ मार्च रोजी जाळून टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, आंनद बिचेवार व अमलदारासह आदीने सदर घटनास्थळी सदर अज्ञात मयतांचा शोध व जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता मयतांच्या जळालेल्या कपड्यावरून व हातातील अंगठ्या व पूर्ण जळालेले शरीर यावरून मयताची ओळख पटविणे व अज्ञात आरोपीचे शोध घेणे कठीण होते.

त्यावेळी झालेल्या घटना च्या ठिकाणी यातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही चौकशी करण्यात आले होते शेजारील राज्याचे सिमालगत पोलीस स्टेशन मधील मिसिंग रेकॉर्डिंग तपासणी करण्यात आले होते मयताची ओळख पटविणे कठीण होते सदर शोध चालू असताना दिनांक 25 मार्च रोज शनिवारी सदर मयत हा असर्जन क्रांतीनगर नांदेड येथील असल्याचे इसम नामे साईनाथ विठ्ठल शिंदे वय 24 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर असल्याचे ओळख निष्पन्न झाले.

सदर मयताची माहिती घेण्यात असले असता त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्यावरून तपासाचे चक्र फिरविले असता आरोपीचे नावे समोर आले. यातील मयतांचे वडील विठ्ठल मानिकराव शिंदे वय ५७ वर्षे व्यवसाय मजुरी क्रांतीनगर असर्जन नांदेड यांनी येऊन उंबरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की गुरुद्वारा गेट०३ येथील सुनिताक्रोर रामसिंग बघेल हिचे मयत साईनाथ शिंदे यांच्यासोबत शारीरिक अनैतिक संबंध आले होते.

त्यात ती विवाह केले नसल्याने सुनिता व तिचा मुलगा जितू यांनी मिळून माझा मुलगा साईनाथ विठ्ठल शिंदेवय २४ वर्षे चा खुन करून त्याचे प्रेत कोर्ट शिवारात आणून जाळून टाकले याबाबत दिलेल्या फिर्यादी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आनंद बीजेवार व त्यांच्या टीमने यातील वरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचयाचे संबंधाने विचार पुस केली असता सदर इसम मयत साईनाथ शिंदे यांचा खून करून त्याची बाॅडी जाळले असल्या बाबद सांगून सदरचा गुन्हा केले असल्याचे कबुली दिली आहे.

सदर आरोपींना उमरी पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी अंकुश माने यांनी माहिती देताना सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरमाळ हे करीत आहेत.

व उमरी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंकुश माने, अंमलदार अरविंद हैबतकर माधव पवार सुजात केळकर यांनीही गुन्हा उघड किस आणणारे पोलीस अधिकारी व अमलदार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंकुश माने, आंनद बिचेवार व पोलीस अमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, रुपेश दासरवाड, संजीव जिकलवाड, सितल सोळंके, राजकुमार डोंगरे महेश बडगु विश्वनाथ पवार चालक हेमत बिचकलेवार व सायबर येथील राजू सिटकर, दीपक ओढणे, आदींचे कौतुक केले.

सदर आरोपींना उमरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी अंकुश माने यांच्या ताब्यात दिले असता यांनीही कसून तपास करीत आहेत. गोरठा शिवारात मयताच्या झालेल्या ठिकाणी कसून तपास अमलदार अरविंद हैबतकर, माधव पवार व सुजात केळकर यांनीही केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker