ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कमळाच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खतगावकर 23 मार्च रोजी बांधणार घड्याळ

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नायगाव व बिलोली मतदार संघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. मात्र भाजपच्या बालेकिल्ल्यात माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर यांनी दि. 23 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा नरसी येथे घेणार असून. यावेळी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घड्याळ बांधणार आहेत. यावेळी नायगावसह बिलोली मतदारसंघातील असंख्य खतगावकर समर्थक प्रवेश करणार आहेत.

माजी मंत्री असलेले भास्करराव पा. खतगावकर यांचे वर्चस्व तर होतेच पण त्यांना जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य समजल्या जात होते. विशेषतः बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी कुणाला निवडून आणायचे एवढी ताकत ते ठेवून होते.

मात्र बदलत्या राजकारणामुळे आणि त्यांनी अलीकडच्या काळात काँग्रेस भाजप पुन्हा भाजप काँग्रेस अशा भुमिकामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला. खतगावकरांचा नायगावसह बिलोली भागात दांडगा जनसंपर्क असला तरी या दोन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत.

दोन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असले तरी त्यांना शह देण्यासाठी आ.चिखलीकरांच्या सोबतीने पक्ष वाढवण्यासाठी नरसी येथे पक्ष प्रवेशाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खतगावकरांचा बालेकिल्ला हा बिलोली मतदारसंघ राहीलेला असला तरी नायगाव मतदारसंघात त्यांचे चांगले जाळे आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या स्नुषा डॉ.मिनल खतगावकर यांनी नायगाव मतदारसंघात 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली त्यांना तब्बल 80 हजार मतदार मिळाली होती. त्यामुळे खतगावकरांचा नायगावसह बिलोली भागात दांडगा जनसंपर्क असल्याने पक्षप्रवेशचा सोहळा त्यांनी नरसीला ठेवला आहे. नरसी ठिकाण हे दोन्ही मतदारसंघातील कार्यकत्यासाठी सोईचे ठरणार आहे.

नरसी येथील होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असून सोमवारी खातगावकरासह इ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे, रामदास पाटील सोमठाणकर, प्रदेश सचिटणीस वसंत सुगावे, अशोक पाटील मुगावकर, राजु गंदीगुडे भास्कर भिलवंडे यांनी सभास्थळाची पाहणी केली. त्यानंतर खतगावकर पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका स्पष्ट केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker