क्राईमताज्या बातम्याबिलोली
हुनगुंदा अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- येथून जवळच असलेल्या हुनगुंदा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी समीर उस्मान शेख (वय २४) रा.हुनगुंदा व सूर्यकांत शंकरराव धर्मापुरे (वय २१) रा.हुनगुंदा या दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी अटक केली होती.
त्यांना आज दि.२२ मार्च रोजी बिलोली येथील न्यायालयासमोर हजर केले असता दोन्हीही आरोपींना दोन दिवस म्हणजेच २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.