भास्करराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निश्चित

मोरे मनोहर
किनाळा :- राजाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या विकासासाठी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश करण्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी घोषित केले असता नरसी येथे अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबरच शेकडो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले बळ मिळाले असुन याचा अन्य पक्षांना मात्र चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.
नरसी येथे 23 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व अन्य दिग्गज नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यपक्ष प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला असून या पक्षप्रवेश मेळाव्यात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, व डॉ. मीनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे घोषित केले.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादीत आपली घडी बसवून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर एक वर आणण्याचा चंग बांधले असून अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या सोबत ते राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश करून घेणार असल्याने कोण कोण नेते भास्कर पाटील यांच्यासोबत जाणार याकडे अनेकांच्या नजरा लागून असल्या तरी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक दिग्गज नेते व शेकडो कार्यकर्ते दादा सोबत राष्ट्रवादीची घडी बांधणार असल्याचे निश्चित झाले असून नरसी येथील पक्षप्रवेश सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात भास्करराव पाटील खतगावकर हे अनुभवी व ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेस पक्षाकडून तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार आणि एक वेळ मंत्रि म्हणून काम करत असताना राज्यातील सर्वात अधिक निराधाराचे प्रश्न सोडवण्याचे काम केले यामुळे सामान्य जनतेचा दादावर आजही मोठा विश्वास असल्याने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते दादा सोबत आज पक्षप्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला चांगलीच बळकटी मिळणार असून अन्य पक्षाला मात्र याचा चांगलाच फटका बसेल असे चित्र सध्या दिसून येत आहे.