रामतीर्थ पोलिसांनी पकडलेला वरलोड रेतीचा ट्रक गुप्त-गु नंतर कारवाई विनाच सोडून दिला

मोरे मनोहर
किनाळा :- बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साह्याने खुलेआम क्षमतेपेक्षा जास्त विना परवाना लाल वाळूची वाहतूक केली जात असताना रामतीर्थ पोलिसांनी दिनांक 17 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास देगलूर कडून नरसी कडे जाणारा लाल वाळुनी भरलेला ओव्हरलोड हायवा ट्रक शंकरनगर जवळ पोलीसांनीच पकडून पोलीस ठाण्याच्या आवारा पर्यंत नेउन पोलीस ठाण्यात न नेता बाहेरच उभा करून ट्रक चालक मालक व पोलीस कर्मचारी यांच्यात अर्धा तास झालेल्या गुप्त गु चर्चे नंतर शेकडो नागरिकांनी पाहिलेला ओव्हरलोड रेतीचा ट्रक रामतीर्थ पोलिसांनी कारवाई विना सोडून दिले.
बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा केला जातो हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असलेल्या प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना माहीत आहे यावर आळा घालण्यासाठी शासनाने अनेक वाळू घाट बंद करुन सामान्य जनतेला योग्य दरात रेती उपलब्ध झाली पाहिजे यासाठी घरकुलधारकांना व गरजू नागरिकांना वाळू ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर डेपोतून वाळू उपलब्ध करून देण्यासाठी काही ठिकाणी वाळू घाटाजवळ वाळू डेपो उपलब्ध करून दिले.
बिलोली तालुक्यातील वाळूचे घाट नावालाच बंद असुन वाळू डेपोत वाळूचा स्टॉक करण्यासाठी म्हणून रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साह्याने नदीपात्रातून भरमसाठ अवैधरित्या वाळूचा उपसा करून ऑनलाइन नाव नोंदणी न करताच महसूल व पोलीसांच्या आशीर्वादाने खुलेआम क्षमतेपेक्षा जास्त अवैध रेती वाहतूक केली जात आहे.
दि.17 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास मांजरा नदी पात्रातील लाल वाळुने शिग लाउन सुमारे दहा ते बारा ब्रास वाळू भरलेला हायवा ट्रक TS 07 UJ 0444 हा देगलूर कडून नरसी कडे जात असताना शंकर नगर जवळ रामतीर्थ पोलीस ठाण्यातील पोलीसांनी पकडून पोलीस ठाण्याच्या जवळ नेले मात्र ठाण्यात न नेता हा वाळूने भरलेला ट्रक बाहेरच उभा करून ट्रक चालत व ट्रक मालक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात तब्बल अर्धा तास गुप्त गु चर्चा झाल्यानंतर ओव्हरलोड वाळू ने भरलेला हायवा ट्रक रामतीर्थ पोलीसांनी कसलीही कारवाई न करताच सोडून दिल्याने पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध व क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक केली जात असल्याचे सामान्य जनतेतून बोलले जात असून याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.