गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कहाळा.बु आणि जि.प.कोलंबी शाळेला 111 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीचे बीज रुजविण्यासाठी नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कहाळा (बू) आणि कोलंबी ता.नायगांव येथे आज दिनांक 25 जानेवारी रोजी एचएआरसी संस्थेतर्फे प्रत्येकी 111 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे एच.ए.आर.सी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, डॉ.सौ.आशा चांडक, प्रवीणकुमार बियाणी, रविकुमार बियाणी, सत्यनारायण चांडक, सौ बसंती चांडक मुख्याध्यापक संभाजी आलेवाड हे उपस्थित होते.

डॉ.पवन चांडक यांनी आनंदी वाचन पेटी उपक्रम म्हणजे वाचन चळवळ आहे जी वाचनप्रेमींनी वाचन प्रेमीसाठी पुस्तक सहज उपलब्ध करून देण्यासाठी चालवली आहे. तसेच संस्था राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त एक वाढदिवस एक पुस्तक उपक्रम राबवून शाळेला पुस्तके देऊन ग्रंथालय समृद्ध करावे असे आवाहन केले तसेच पुस्तके वाचताना वाचा, वेचा, आठवा, साठवा आणि पाठवा या पंचसूत्रीचा अवलंब करावा असे सांगितले. डॉ.सौ.आशा चांडक यांनी कहाळा येथील शाळेत किशोरवयीन मुलींना वयात येताना होणारे बदल तसेच मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने आजवर संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे, नाशिक जिल्ह्यातील 184 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आल्याचे सांगितले. १११पुस्तकांच्या आनंदी वाचन पेटी मध्ये १११ पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे.

कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन श्री. पाटील सर यांनी केले आभार प्रदर्शन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री.संभाजी आलेवाड यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.सुनील पाटील लुंगारे (सरपंच तथा उपाध्यक्ष शा.व्य.समिती) श्री.नय्यूम सय्यद (अध्यक्ष शा.व्य.समिती) मा.ग्रामसेवक श्री.कदम, श्री.पठाण, श्री.आमेटवाड, श्री.वानखेडे, श्री.होळकर, श्री.हंबर्डे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker