ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ बंद ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

कुंडलवाडी :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे दि.२९ जानेवारी रोजी कुंडलवाडी शहर बंदची हाक देण्यात आली होती. यास शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बाजारपेठ १०० टक्के बंद ठेवली. तसेच मुख्य बाजारपेठेतील डॉ.हेडगेवार चौक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शोकसभा घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.



