गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

अजितदादांच्या श्रद्धांजलीसाठी शंकरनगर व्यापारपेठ दिवसभर कडकडीत बंद

मोरे मनोहर

किनाळा :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले असल्याने त्यांना शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेले सर्व व्यापारपेठ 29 जानेवारी रोजी दिवसभर कडकडीत बंद पाळुन येथील व्यापारी असोसिएशन व रामतीर्थ आणि शंकरनगर येथील अनेक शाळेत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आले.

शंकरनगर तालुका बिलोली येथील जिजामाता चौकात सकाळी दहा वाजता रामतीर्थ व शंकरनगर येथील व्यापारी असोसिएशन आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली वाहिले.

राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा शिक्षण संस्थेच्या सचिव असलेल्या गोदावरी मनावर पब्लिक स्कूल व श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कै.मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य धनंजय शेळके, प्राचार्य दुर्गा प्रसाद पांड्ये, डॉ किसन गायकवाड, मुख्याध्यापक वडजे, शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker