शास्वत विकासात युवकांची भुमीका अतिशय महत्वपूर्ण – प्राचार्य डॉ.बी.डी.इंगळे

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- शरदचंद्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मौजे परडवाडी या ठीकाणी संपन्न झाले. यावेली शास्वत विकासात आणि समाज परिवर्तनात युवकांची भूमीका महत्वपूर्ण असते. त्यासाठी विद्यार्थी घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना ही महत्वाची असते. याद्वारे विद्यार्थी घडत असतात असे उदगार ईंगले सरांनी उदघाटनपर भाषनात काढले. हे शिबिर 26 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंटूर मार्केट कमीटीचे मा.संचालक तथा महाविद्यलयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गो.रा.परडे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सौ.डॉ.शकुंतला शिंदे, गणित विभाग प्रमुख डॉ.अमितकुमार पांडे, गावच्या सरपंच सौ.संगीता गोविंदराव परडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.सदाशिव आगलावे, चेरमन नारायण पा.कराले, श्री.रामराव पा.बोरकर, श्री.वंसत पा.परडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील सौ.डॉ.एस.बी.वाडेकर, सौ.प्रा.अश्विनी जक्कावाड, डॉ.सिद्धेश्वर राऊत यांच्यासह इतर प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.शिंदे मैडम व डॉ. पांडे यानीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी “शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास” या विषयावर विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.एम.एस.कदम यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे स्पष्ट करत या विशेष शिबिरामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती दिली व स्वयंसेवकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.गो.रा.पारडे यांनी युवक हे समाज व राष्ट्र विकासाचे प्रमुख घटक असून NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, नेतृत्वगुण व जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात गावचे भूमीपुत्र प्रा.बालाजी वाघमारे यांना पी.एचडी. मिलवल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कुमारी वैष्णवी व पुनम यांनी केले, तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी प्रा. साईगणेश यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.पी.डी.तावडे, गावकरी शेषराव पाटील कराले, मारोती वाघमारे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



