गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवरील गोदावरी नदी जवळ चाकूचा धाक व मिरची पूड टाकून दुचाकीस्वारास लुटले

◆९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास ◆३ अज्ञात आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुंडलवाडी :- धर्माबाद कडून कुंडलवाडी मार्ग बिलोलीकडे जात असताना दुचाकीस्वार युवकास गोदावरी नदीवरील बाभळी पुल ते शेळगाव थडी या गावच्या दरम्यान चाकूचा धाक व मिरचीची पूड टाकून लुटल्याची घटना दि.१९ एप्रिल रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपी विरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील रहिवासी कपिल शंकर वाघमारे हा युवक त्याचा चुलत भाऊ संदिप वाघमारे व मित्रा सोबत धर्माबाद येथून बिलोली कडे वाढदिवस कार्यक्रमासाठी दि.१९ एप्रिल रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास मोटारसायकल क्र.एम एच २६ सी के ८६८२ वरून जात असताना गोदावरी नदीवरील बाभळी पूल ते शेळगाव थडी या गावच्या दरम्यान आले असताना पाठीमागून धर्माबादकडून एका मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गाडी थांबव असे म्हणल्यानंतर कपिल वाघमारे यांनी मोटरसायकल थांबवली.

यानंतर मोटरसायकल वरील बसलेल्या एकाने कपिल वाघमारे यांच्या डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकली व सोबतच्या एकाने चाकू दाखवला त्यावेळी घाबरून कपिल वाघमारे व सोबत असलेल्या चुलत भाऊ संदीप वाघमारे व त्याचे मित्र शेळगाव थडी या गावाच्या दिशेने पळत असताना अज्ञात तीन व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवून कपिल वाघमारे यांच्या जवळील ८ हजार रुपयांचा मोबाईल, नगदी ४० हजार रुपये व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी कपिल वाघमारे यांच्या तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker