पकडलेल्या ‘त्या’ हायवावर रामतीर्थ पोलिसांनी दंडात्मक कारवाईची कलमे न लावता पुढील कारवाईचा चेंडू तहसीलदारांच्या दारात ढकलला

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत दंडात्मक कारवाईचे कलमे जोडली नाहीत. पण दि. २० जुलै रोजी पकडलेल्या हायवावर गुन्हा नोंद केल्याच्या एफ आय आर ची प्रत जोडून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे पत्र नायगाव तहसीलदारांना दिले आहे. असे पत्र पाठवून पुढील कारवाईचा चेंडू तहसीलदारांच्या दारात ढकलल्याने या प्रकरणात मोठी अर्थिक तडजोड करुन वाळू माफीयाला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
रामतीर्थ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दि. २० जुलै रोजी नरसी मुखेड रोडवर असलेल्या ट्रव्हल्स पाँईंटच्या ठिकाणी वाळू ने भरलेला हायवा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे घटनास्थळी जावून पाहणी केली असता बारा चाकी एम एच २६, सीव्ही ९५५५ या क्रमांकाचा हायवा दिसून आला. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता चालकाने नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचा हायवा जप्त करून भारतीय न्याय सहिंतेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद केला. वास्तविक अवैध वाळू वाहतूक करत असताना पकडलेल्या हायवावर कलम ३०३(२) बरोबरच ३१०(२), १३२, ३५१(२), ११८(१), ११५ (२), ३३२ (C), ३(५)), आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) दंडाची कलमे लावणे आवश्यक होती.
याबाबत दि. १७ जुलै २०२५ रोजी सरकारने शासन निर्णय जारी करुन स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी फक्त ३०३(२) एकच कलम लावून शासन निर्णय फाट्यावर मारला होता. मात्र महाराष्ट्र महसूल अधिनियमाचे कलमे का लावण्यात आली नाही अशी विचारणा केली असता ते कलम लावण्याचा मला अधिकार नाही आणि संयुक्त कारवाई असेल तरच ते कलम लावता येतात असे सांगितले.
हराळे यांनी दिलेली खोटी माहिती वरिष्ठापर्यंत गेल्यानंतर त्यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्याचे समजले तरीही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) ही दंडात्मक कलमे वाढवली नाहीत पण दि. २२ जुलै रोजी नायगाव तहसीलदारांना बंद लिफाफ्यात एक पत्र पाठवले. त्यात पोलीस स्टेशन रामतीर्थ गुरनं १४९/२०२६ कलम BNS प्रमाणे पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल आसून सदर गुन्हयाचा तपास आम्ही करीत आहोत.
सदर गुन्हयात आरोपी चालकाचे ताब्यातून ए/- दहा चाकी भारत बेंज कंपनीचा हायवा (टिपर) जिचा क्र एम एच २६, सी व्ही ९५५५ आहे व ज्याचे मध्ये गौन खनिज रेती अंदाजे ०५ ब्रास असा एकूण एकुण ४०,२०००० मुददेमाल जप्त करण्यात आलेले आहे. सदरचा गुन्हा हा गौण खनिज रेती वाळू संबंधाने असल्याने सदर गुन्हयाची एफ.आय.आर.प्रत ाव व पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर करण्यात येत आहे.
असे पत्र पाठवून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी गुन्हा नोंद केलेल्या हायवावर दंडात्मक कारवाई करण्याचा चेंडू तहसीलदारांनाच्या दारात ढकलला आहे. हायवा थेट न्यायालयाच्या आदेशाने सुटावा वाळू माफीयाला दंडात्मक कारवाई पासून वाचवता यावे यासाठी हराळे यांनी चतुराई केली होती पण ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्याने प्रयत्न फसला आहे. याबाबत तहसीलदार काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.



