ताज्या बातम्यानांदेडनायगांव

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला नायगाव व नरसी परिसरात मिळाला चांगला प्रतिसाद

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमार प्रकरणी वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला गुरुवारी नायगाव व नरसी परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. गुरुवारी नायगावचा आठवडी बाजार असतांनाही व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यासठी दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळ वापरून मोडीत काढण्याचा तर प्रयत्न करण्यात आलाच पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध आणि आंदोलनाला पाठींबा म्हणून वंचित बहूजन आघाडीणे प्रमुख अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पुकारलेल्या बंदमध्ये नायगाव व नरसी परिसरातील आंबेडकरी चळवळीतील जनतेने सक्रिय सहभाग नोंदवला व बंद पाळला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते भगवानरावं अचोलीकर, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, माजी शहराध्यक्ष सतीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते कपिल डुमणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे, मिलिंद बचाव, बालाजी रातोळीकर, बाळासाहेब सोनकांबळे, राजू भद्रे, विनोद भालेराव, संतोष भालेराव, अविनाश गायकवाड, ज्योतिबा वाघमारे, मुरली भद्रे, धम्मानंद मांजरमकर, गौतम हनुमंते, नामदेवराव भद्रे, सुधाकर भद्रे, कैलास भद्रे, प्रशांत वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, शुद्धोधन लांडगे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नरसी येथे रणजित देशमुख, साईनाथ जिगळेकर, बबलू नरसीकर, मोहनराव कोपरेकर, शाम गायकवाड, बालाजी गायकवाड, सचिन भेदे, विठ्ठल पाटील गवळी, भाई मैनोद्दीन हुसेनसाब, मोहियोद्दीन शेख, भगवानराव अंचोलीकर, आनंद जाधव होटाळकर, विश्वांभर कांबळे, राहूल डुमणे व राजाराम कांबळे यांच्यासह अनेकांच्या सह्या असलेदे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker