जिगळा येथील तलावात अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडले ; रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंद

मोरे मनोहर
किनाळा :- तळणी प्रकल्प असलेल्या जिगळा तलावात लोहगाव येथील भोई समाजाचे विशाल डुबुकवाड हे आपल्या सहकार्यासह दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास मासे धरण्यासाठी तलावामध्ये गेले असता त्यांना तलावात सडलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले हि घटना रामतीर्थ पोलीसांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीचा तलावाच्या बाजूलाच दि. 23 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेची रामतीर्थ पोलीस ठाण्यात आकस्मीत
सविस्तर माहिती अशी की दि.22 फेब्रुवारी रोजी लोहगाव येथील विशाल डुबुकवाड हे आपल्या सहकार्यासह दुपारी दोनच्या सुमारास मासे धरण्यासाठी तलावामध्ये गेले असता त्यांना तलावातून सडलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले असता तलावा शेजारच्या शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनी यांची माहिती शंकरनगर येथील पत्रकार हनमंत पाटील वाडेकर यांना दिली असता वाडेकर यांनी रामतीर्थ पोलीस स्टेशनला ही माहिती दिले.
रामतीर्थ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी.जी बेळिकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु 22 फेब्रुवारी रोजी उशीर होउन अंधार पडल्यामुळे तलावाच्या मधोमध असलेले प्रेत तलावातून बाहेर काढण्यासाठी कोणीही मिळाले नसल्याने दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास रामतीर्थ बीट जमादार एस जी शिंदे,पी.जी बेळीकर यांनी यसगी तालुका बिलोली येथून भोई समाजाचे गंगाधर दाऊ बटलवार, मकाभोई मकलवार यांना बोलावून तलावातून प्रेत बाहेर काढले.
सदरील प्रेत सडल्याने त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटू शकली नसुन प्रेताच्या अंगात पांढरा रेगाळा शर्ट व काळा पॅन्ट कमरेला करदोडा आणि त्याच्या खिशात पिवळ्या रंगाची रुमाल पोलीसांना दिसून आली. सडलेल्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी लोहगाव येथील वैद्यकीय अधिकारी विशाल जाधव यांना बोलावून तलावा जवळच सदरील प्रेताचे शवविच्छेदन करून तिथेच तलावाच्या काठावर त्या अज्ञात व्यक्तीचे दफन करण्यात आले आहे.
सदरील अज्ञात व्यक्ती कोणत्या गावचा आहे, तो तलावात पडून आत्महत्या केला कि चुकुन तलावाच्या पाण्यात पडल्याने मृत्यू पावला या मागचे नेमके कारण काय हे समजू शकले नाही मात्र तो अज्ञात व्यक्ती नेमका कुण्या गावाचा आणि तो इथे कशासाठीआला होता या मृत्यूच्या मागचे नेमके कारण काय हे मात्र कळु शकले नसुन या प्रकरणी जिगळा येथील संजय व्यंकटराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.