अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा गटविकास अधिकाऱ्याचा प्रयत्न

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मनरेगाच्या नवीन कामाला तर परवानगी नकोच पण वर्क कोड दिल्यानंतर सुर न झालेली कामेही करण्यात येवू नये असे आदेश आयुक्तांचे होते. मात्र नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी तालुक्यात तब्बल 29 नवीन कामे करण्यासाठी समंती दिले. मात्र हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आपले पाप दुसऱ्याच्या डोक्यावर मारण्यासाठी शाखा अभियंता,तांत्रिक सहायक, रोजगार सहायकासह पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गटविकास नायगाव एल.आर. वाजे यांनी वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत नायगाव तालुक्यातील बळेगाव, चारवाडी, इकळीमाळ, हिप्परगा जाने. हुस्सा, कहाळा खु, कोठाळा, मांजरम, मनूर त.ब., मरवाळी तांडा, परडवाडी, रुई, सालेगाव, सांगवी, सोमठाणा, सुजलेगाव, तलबीड व टेंभुर्णी अदि गावात मातोश्री पांदन रस्ता, सिमेंट रस्ते, खडीकरण, पेव्हर ब्लाक कामे सुरु करण्यास पंचायत समितीच्या स्तरावरुन समंती दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेने दि. 30 जानेवारी रोजी नायगाव पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकारी व संगणक चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे सदरचे प्रकरण गटविकास अधिकारी वाजे यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे वाजे यांनी आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्यासाचा आता जोरदार प्रयत्न करत आहेत.
गटविकास अधिकारी वाजे यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी एम.ए. जीरवणकर शाखा अभियंता बांधकाम, गोनेवार, तांत्रिक सहायक,मनरेगा कक्ष, रोजगार सेवक, यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नवीन कामे सुरू करण्यास स्थगिती दिल्यानंतर ही सदर कामे सुरू करण्यात आलेली आहेत, तरी सदर कामाचे जिओ टॅगीग कधी केले, या कामाचे मार्कआउट कधी दिले व काम मागणी कधी केली, या बार्बीचा स्वयः स्पष्ट खुलासा नोटिस मिळाल्या पासून चौवीस तासाच्या आत सर्व पुराव्या निशी लेखी या कार्यालयात सादर करावा. नोटिसीचा खुलासा विहित मुदतीत या कार्यालयास सादर न झाल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित करून पुढील प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल यांची गंभीर नोंद घेण्यात असा इशारा दिला आहे.
अर्थिक तडजोडी करुन गटविकास अधिकारी अगोदर समंती देतात आणि प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने दुसऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्वतः नामनिराळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.