कुंडलवाडी पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यास आठ तासात पकडले

कुंडलवाडी :- शहरातील का-हाळ रोडवरील मलकापूर शिवारातून मोटरसायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस कुंडलवाडी पोलिसांनी अवघ्या ८ तासात अटक केली असून आरोपीकडून चोरीला गेलेली मोटरसायकल व इतर एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
शहरातील वंजार गल्ली भागातील इरेश गंगाधर गंगोणे यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.२६ बी.एम. ५७१३ हि ४० हजार रुपये किमतीची का-हाळ रोडवरील मलकापूर शिवारातून दि. ६ फेब्रुवारी रात्री ९ वाजता चोरीस गेली होती. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं.१६/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ माधव पाटील, पोहेकाँ नागेंद्र कांबळे, पोहेकाँ गफुर शेख यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत आरोपी गंगाधर नागोराव सोनकांबळे (रा.बडूर) यास कुंडलवाडी शहरातील आठवडी बाजारातून अवघ्या ८ तासात अटक करून आरोपीकडून चोरीला गेलेली मोटरसायकल व इतर एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
आरोपीकडून अजून काही मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडून आरोपीस पोलीस कोठडी घेण्यात येऊन तपास करण्यात करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.