ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली : पाच दिवस उलटले तरी एकानेही खुलासा सादर केला नाही

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मनरेगा प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी शाखा अभियंता, तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रमाधिकारी रोजगार सेवकांना दि. 5 फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. परंतु पाच दिवस उलटले परंतु एकानेही खुलासा सादर केला नसल्याने शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी नोटीसा बजावण्याचे नाटक करण्यात आले असल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तूळात रंगली आहे.

नायगाव तालुक्यात मनरेगाच्या कामात संगणमताने भ्रष्टाचार करण्याची मोहीम सुरु आहे. त्यातच केंद्र शासनाने या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी दि. 4 डिसेंबर 2024 पासून नवीन काम न करण्याचे आदेश दिले होते. अगोदर वर्क कोड दिला असला तरी ही नवीन काम नकोच अशी भुमिका घेतली होती.

तरीही नायगाव तालुक्यातील सुबळेगाव, चारवाडी, इकळीमाळ, हिप्परगा जाने. हुस्सा, कहाळा खु, कोठाळा, मांजरम, मनूर त.ब., मरवाळी तांडा, परडवाडी, रुई, सालेगाव, सांगवी, सोमठाणा, सुजलेगाव, तलबीड व टेंभुर्णी अदि गावात मातोश्री पांदन रस्ता, सिमेंट रस्ते, खडीकरण, पेव्हर ब्लाक कामे सुरु करण्यास पंचायत समितीच्या स्तरावरुन समंती दिली.

त्यामुळे जिल्हा परिषदेने ३० जानेवारी रोजी नायगाव पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकारी व संगणक चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हे प्रकरण उलटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी एम.ए. जीरवणकर शाखा अभियंता बांधकाम, गोनेवार, तांत्रिक सहायक,मनरेगा कक्ष, रोजगार सेवक, यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नवीन कामे सुरू करण्यास स्थगिती दिल्यानंतर ही सदर कामे सुरू करण्यात आलेली आहेत.

तरी सदर कामाचे जिओ टॅगीग कधी केले, या कामाचे मार्कआउट कधी दिले व काम मागणी कधी केली, या बार्बीचा स्वयः स्पष्ट खुलासा नोटीस मिळाल्या पासून चौवीस तासाच्या आत सर्व पुराव्या निशी लेखी या कार्यालयात सादर करावा. नोटिसीचा खुलासा विहित मुदतीत या कार्यालयास सादर न झाल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित करून पुढील प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल यांची गंभीर नोंद घेण्यात असा इशारा दिला होता.

एवढ्या गंभीर प्रकरणाची एकाही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दखल तर घेतलीच नाही पण गटविकास अधिकाऱ्याच्या नोटीसीला कचरा कुंडी दाखवली आहे. पाच दिवस उलटले तरी एकानेही लेखी खुलासा सादर केला नाही. संगणमताने केलेल्या भ्रष्टाचारात आम्ही कारवाई करत आहोत असा देखावा करण्यासाठी गटविकास अधिकारी वाजे यांनी नोटीसीचे नाटक केले असल्याने ते शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याची जोरदार चर्चा पंचायत समितीच्या वर्तूळात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker