कुंटूर येथील घोंगडीला मुख्यमंत्र्यांनी दिले शुभेच्छा मुंबई महालक्ष्मी सरस बाजारपेठेत मध्ये कुंटूरच्या घोंगडीला मिळाला मानाचा दर्जा

अनिल कांबळे
कुंटूर :- नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील महिला बचत गटाच्या वतीने बनवण्यात येणाऱ्या मेंढीच्या केसापासून बनवलेल्या घोंगडीला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेत घोंगडीला महत्त्व मिळाले असून 11 फेब्रुवारी रोजी मुंबई महालक्ष्मी सरस येथे महाराष्ट्रातील सर्व उत्कृष्ट महिला बचत गटाच्या उत्पादन वस्तूवर प्रदर्शनाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंटूर येथील बचत गटाच्या स्टॉलला भेट दिली व त्या घोंगडीचे कौतुक केले.
सदर महिला बचत गटाच्या कामाची स्तुती केली त्याचबरोबर त्या बचत गटांना उत्पादन म्हणून बाजारपेठ मिळवून देणाऱ्या कुंटूर येथील आयसीआरपी रेखाताई अनिल कांबळे कुंटूरकर यांचेही नावाचे उल्लेख करत त्यांनी शुभेच्छा दिल्या. कुंटूर हे गाव आम्हाला ओळखीचे असून तेथील राजेश कुंटूरकर हे आमचे जवळचे मित्र आहेत असेही यावेळी त्यांनी उद्गार काढले. त्यामुळे कुंटूर हे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एकला महिला बचत गटाच्या वतीने गाजत असल्याची चर्चा मात्र गाव परिसरात जोरदार सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नायगाव तालुका अभियान गटविकास अधिकारी एल आर वाजे, तालुका व्यवस्थापक अमोल जोंधळे, इरवंत सुर्यकार व बाबू चंद्रकांत डोळे, समूह संसाधन व्यक्ती रेखाताई कांबळे, यांनी सदर महिला बचत गटाच्या स्थापनेला महत्त्व देत त्यांनी गाव पातळी महिला गटांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले, व्यवसाय व आर्थिक उलाढालीसाठी प्रयत्न केले. गाव पातळीवर समूह संसाधन- व्यक्ती रेखा कांबळे कुंटूरकर यांनीही बचत गटाचे बांधणी करून त्यांना महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठ व त्यांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीसाठी प्रदर्शनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिले.
यामध्ये मोलाचे कार्य पंचायत समिती गटविकास अधिकारी एल.आर.वाजे, यांचेही मोलाचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे सदर कुंटूर येथील महालक्ष्मी महिला बचत गटाचे अध्यक्ष माळसाबाई वडे, सचिव गंगाबाई माहादळे, नंदा अंबटवाड, सदर महिला मुंबईमध्ये बाजारपेठेत आपल्या घोंगडी विक्रीसाठी गेले आहेत. महिला बचत गटाचे घोंगडी आज महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याचे वरिष्ठ अधिकाराने सांगितले. त्यामुळे कुंटूर च्या घोंगडीला मुंबईच्या बाजारपेठेतही मानाचा स्थान मिळाला असल्याचेही दिसून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.