ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ ठाण्याअंतर्गत डीजे मुक्त विस गणेश मंडळाचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ठाण्याअंतर्गत असलेल्या गावातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक गावातील प्रत्येक गणेश मंडळांनी डीजे मुक्त गणेश विसर्जन करावे अशा सूचना दिले असता विस गणेश मंडळांनी डि.जे. मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येईल असे हमीपत्र लिहून दिल्याने या 20 ही गणेश मंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या शुभहस्ते दि. 4 सप्टेंबर रोजी नांदेड येथील मंथन हॉलमध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांनी आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच ,पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष , चेअरमन याबरोबरच गावातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक घेऊन एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवले पाहिजेत याबरोबरच डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावे यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व मार्गदर्शन केले असता त्यांच्या या सूचनेनुसार रामतीर्थ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुमारे गणेश मंडळांनी डीजे मुक्त श्री गणेशाचे विसर्जन करण्याचा संकल्प करून पोलीस ठाण्यास शपतपत्र लिहून दिले.

श्री गणेशाचे विसर्जन डीजे मुक्त करण्याचा संकल्प करणाऱ्या रामतीर्थ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विस गणेश मंडळांनी अतिशय उत्तम निर्णय घेतल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे 4 सप्टेंबर रोजी नांदेड येथे विशेष कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले यावेळी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker