ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

ट्रक्टर ट्रँलीसह विहिरीत पडला : सात महिला मजुरांचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : आलेगाव शिवारातील एका शेतात भुईमूग निंदणीच्या कामासाठी मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहीरीत पडल्याने सात महिला मजूरांना जलसमाधी मिळाली तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. सदरच्या अपघाताची माहिती समजताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वजताच्या दरम्यान घडली. या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुख व्यक्त केले असून मयताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात भुईमूगाच्या शेतात निंदणी करण्यासाठी जवळच असलेल्या गुंज येथील ७ महिला व ४ पुरुष मजूर असे दहा जण एका ट्रॅक्टरमधून जात होते. ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या ७० फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळले. यातील तिघेजण बाहेर निघाले तर ७ महीला मजूर विहिरीतील पाण्यात जलसमाधी मिळाली. दोन जनरेटर वापरून व कृषी पंपाच्या साह्याने पाणी उपसा करण्यात आला. निळा, आलेगाव, गुंज येथील गावकऱ्यांनीही घटनास्थळी अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये मरण पावणाऱ्या महिलांची नावे ताराबाई सटवाजी जाधव (35), धुरपदा सटवाजी जाधव (28), सरस्वती लखन बुरड (25) सिमरण संतोष कांबळे (18), चऊत्राबाई माधव पारधे (45), ज्योती इरबाजी सरोदे (35) आणि सपना तुकाराम राऊत अशी आहेत. या घटनेतील तीन पुरूष कामगार आणि ट्रॅक्टर चालक जखमी आहेत अशी माहिती सांगण्यात आली. लिंबगावा पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker