ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

“विरोधकांनाही सन्मानाने वागवले पाहिजे ही शिकवण स्व.गंगाधरराव कुंटुरकर यांनी दिली” – सूर्यकांता पाटील

स्व.गंगाधरराव कुंटूरकर यांचा स्मृती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :-“वर्तमानकाळात राजकीय विद्वेश शिगेला पोहोचला आहे. जनहित तर सोडाच पण लोकशाहीसुध्दा आपण खिळखिळी करून टाकली आहे. अशा पार्श्वभूमीवर स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांची भारदस्त कारकीर्द आपल्याला आठवत राहते. एक उमदा आणि आपल्या कार्याची महाराष्ट्रभर छाप उमटवणारा नेता म्हणून आणि आपल्या राजकिय विरोधकालाही सन्मानाने वागवणारे गंगाधरराव आजच्या राजकारण्यांसाठी आणि लोकांसाठी एक दिपस्तंभ आहेत.

त्यांची उणीव कायम जाणवत राहणार आहे पण आपण त्यांचा हा वैचारिक भारदस्त वारसा पुढे चालवला पाहिजे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा अभ्यासू वक्त्या सूर्यकांताताई पाटी यांनी केले. ते कुंटूर येथील पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्व. गंगाधरराव कुंटूरकर स्मृती समारोह व साने गुरुजी प्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होत्या.

त्यांचे ’स्व.गंगधरराव कुंटूरकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या विषयावर सविस्तर व्याख्यान संपन्न झाले. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा विचारवंत वक्ते माधवराव किन्हाळकर उपस्थित होते. “जो भूतकाळाचा मागोवा घेऊ शकतो, जो वर्तमानाचे भान जागवू शकतो आणि भविष्याचा वेध घेऊ शकतो तोच खरा लोकनेता असतो. असा लोकनेता म्हणून आम्ही स्व.गंगाधरराव यांच्याकडे पाहतो.

भारतीय लोकशाही आज धोक्यात आली आहे. निवडून येणारे लोकांप्रतिची कर्तव्यभावना विसरून जात आहेत. निवडणूकांचा घोडेबाजार झाला आहे. न्यायव्यवस्था हतबल झाली आहे, अशा काळात गंगाधरराव कुंटूरकर, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब गोरठेकर, बापूसाहेब बारडकर, पद्मश्री शामराव कदम, स्व.किन्हाळकर यांच्या कार्याचा आणि विचाराचा वारसा नव्या पिढीसमोर मांडणे आवश्यक आहे.

याअनुषंगाने ही व्याख्यानमाला महत्वाची आहे.” असे मत यावेळी डॉ. किन्हाळकर यांनी व्यक्त केले.
कुंटूरकर शुगरचे चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर, दत्ता बारगजे, भारत सातपुते यांचीही यावेळी भाषणे संपन्न झाली. यावेळी निमंत्रक रुपेश कुंटूरकर, सूर्यकांत पा. कदम, सूर्याजी पा. चाडकर, शिवाजी पा.होळकर, बाबुराव पा. आडकीने, सरपंच आशाताई कदम, बालाजीराव पवार, डॉ. विलास पवार, रोषणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात चळवळीचे साने गुरुजी सेवा सन्मान २०२४ हे पुरस्कार बीड येथील एच.आय.व्ही. बाधित बालकांची सेवा करणारे दत्ता बारगजे, ज्येष्ठ कार्यकर्ते तथा विद्यार्थीप्रिय प्रा.डॉ.बालाजी कोंपलवार, बचत गट प्रेरक रेखाताई कांबळे यांना तर वाङ्मय पुरस्कार २०२४ हे लातूरचे ज्येष्ठ लेखक भारत सातपुते व नांदेडच्या बालकवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांना प्रदान करण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजक मारोतराव कदम यांनी केले. संचालन डॉ. बाळू दुगडूमवार यांनी तर आभार बालाजी तेजेराव कदम यांनी व्यक्त केले.

या समारंभासाठी निमंत्रक रुपेश देशमुख कुंटूरकर, संयोजक मारोतराव कदम, कार्यवाह विनोद झुंजारे, सहकार्यवाह शिवाजी आडकीने, डॉ. बाळू दुगडूमवार, राजेश आडकीने, राजेंद्र नालिकंठे, गजानन आडकीने, युसुफ शेख, प्रदीप आडकीने, सूर्यकांत बिसमिले, विजय आडकीने, बालाजी आडकीने, नितीन महादाळे, योगेश चिंताके, राम इळतगावे, ओमकार डांगे, प्रविंद दुगडूमवार यांच्यासह साने गुरुजींच्या सर्व धडपडणाऱ्या मुलांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker