ताज्या बातम्यानायगांवबिलोली

रेती व मुरुम, वसूली आणि कान भरण्याच्या प्रकारामुळे बिलोली उपविभागातील दोन अधिकाऱ्यात शितयुध्द

प्रभाकर लखपत्रेवार

नांदेड : बिलोली उपविभागात येणाऱ्या नायगाव व बिलोली तालुक्यात मुरुम व रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहणांची वसुली दोन अधिकारी वेगवेगळे करतात. त्यामुळे मुरुम व रेती माफीया दोन अधिकाऱ्यात विभागले गेले आहेत. परिणामी दोन्ही अधिकारी आपल्याशी संबधीत नसलेल्या एक दुसऱ्यांच्या वाहणावर कारवाई करतात असा समज झाला आहे.

त्यामुळे एकदुसऱ्याचे समर्थक असलेले माफीया अधिकाऱ्यांचे कान भरण्याचे काम करत आहेत. त्यामुळे महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यात शितयुध्द सुरु झाले असून ते दोन्ही अधिकारी एकदुसऱ्याला पाण्यात बघत आहेत.

बिलोली उपविभागात वैध अवैध रेती व मुरुमाची वाहतूक करणारी जवळपास 150 वाहणे आहेत. या वाहनांना महसूलसह पोलीसांनाही हप्ता द्यावा लागतो. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे वाहणधारक दरमहा 15 ते 25 हजार रुपये हप्ता देतात. हप्ता देतांना रेती व मुरुमाची वाहतूक करणारे कुणी कारवाई करु नये यासाठी अधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबध निर्माण करण्याबरोबरच अधिकाऱ्यांच्या गुडबुकमध्ये राहण्याचाही प्रयत्न करतात.

त्यामुळे रेती व मुरुमाचा धंदा करणारे या दोन अधिकाऱ्याचे समर्थक बनल्याने यांच्यातही दोन गट पडले आहेत. त्यामुळे एखादी कारवाई झाली कि माफीया आपापल्या अधिकाऱ्यांना फोन लावतात आणि मी तुमचा समर्थक असल्याने अमूक अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक कारवाई केल्याचे सांगताना बरच काही बोलून जातात.

हे माफीया ज्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना हप्ता देतात ते ही अधिकाऱ्यांचे कान भरण्याचे काम करत आहेत. रेती व मुरुम माफीयातील दोन गट आणि हप्ता वसूली करणारे यांच्यामुळे बिलोली महसूल उपविभागात कळीचा मुद्दा बनला. या दोन अधिकाऱ्यांचे समर्थक कुठे बसतात कुणासोबत बसतात याची इत्यंभूत माहिती दररोज आपापल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. या प्रकारामुळे कर्मचारीही बाहेर कुठे बसताना बरीच काळजी तर घेत आहेतच पण एकदुसऱ्याच्या निदर्शनास येणार नाही असाही प्रयत्न करत आहेत.

दोन अधिकाऱ्यातील शितयुध्दामुळे काही कर्मचारी एकदुसऱ्याच्या टार्गेटवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या वादात आम्हाला का ओढण्यात येत आहे असा प्रश्न ते उपस्थित करतात. वाहणावर कारवाई करणारे अधिकारी, लाखो रुपये एजंटामार्फत जमा करणारे अधिकारीच आहेत मात्र दोन अधिकाऱ्यात सुरु असलेले शितयुध्द मात्र चर्चेचा विषय बनले आहे. दोन अधिकाऱ्यात शितयुध्द सुरु असले तरी हप्तेखोरी मात्र सुरुच आहे हे विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker