कुंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पोलिसांची कारवाई : 38 हजाराच्या देशी दारुसह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून नायगाव पोलिसांनी कुंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करत 38 हजाराच्या देशी दारुसह 1 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे कुंटर पोलीसांची चांगलीच पंचायत झाली आहे.
अवैध वाळू बरोबर अवैध दारु विक्रीला कुंटर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांनी पाठबळ दिले होते. कारण कुंटूर ठाण्याच्या हद्दीसह बळेगाव येथील अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी अनेकवेळा नागरिकांनी केली होती. परंतु सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांनी मात्र नागरिकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत अवैध दारु विक्रीला पाठींबा देण्याचीच भुमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल परिसरात नाराजीही वाढली होती. मात्र बळेगाव येथील गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत गेली त्यामुळे गुरुवारी कारवाई करण्यात आली.
बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांना कुंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेगाव येथील बाबाराव कोंडीबा बेलकर हा अवैध दारुची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी कुंटूर ऐवजी नायगाव पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी साईनाथ सांगवीकर व बालाजी शिंदे यांनी पानेगावकर यांच्या आदेशानुसार कारवाई सापळा लावला. खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन कुटुंर अंतर्गत बळेगाव येथे रवाना झालो असता मौ.बळेगाव येथे आले असता आम्हास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बळेगाव येथील बाबाराव कोंडीबा बेलकर हा त्याचे काळ्या रंगाचे अल्टो कार क्र. MH-38-1053 मध्ये त्याचे मुलासह देशी दारु भिंगरी संत्राची चोरटी वाहतुक करुन विक्री करीता घेवुन येणार आहे.
अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याणे आम्ही दोन पंचाना बोलावुन त्यांना प्रो. रेड बाबत माहीती सागुन पंचासह मिळालेल्या ठिकाणी बळेगाव ते रुई जानारे डांबरी रोड लगत बाबाराव कोंडीबा बेलकर याचे शेतातील टिन शेड मागे दबा धरून बसलो असता तेथे वेळ 23.30 वाजताचे सुमारास एक काळ्या रंगाची संशंईत कार टिन शेड जवळ येवुन थांबल्याचे तेथील लाईटचे उजेडात दिसल्याने आम्ही त्यांचे वर अचानक छापा मारला असता सदर काळ्या रंगाचे अल्टो कार मध्ये दोन ईसम मिळुन आले.
पोलिसांनी सदर कार पंचा समक्ष पाहणी केली असता सदर कार एम एच 38-1053 असा दिसला चालकाचे शिटवर बसलेल्या ईसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बाबाराव कोंडीबी बेलकर वय 48 वर्षे व्यावसाय शेती रा. बळेगाव ता. नायगाव व त्याचे बाजुस बसलेल्या शिटवरील ईसमास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव तिरुपती बाबाराव बेलकर वय 20 वर्षे व्यवसाय शिक्षण रा.बळेगाव ता. नायगाव असे सांगीतले त्यास कार मध्ये काय आहे. असे विचारता त्याने कार मधील पाठी मागील सिटवर देशि दारुचे बॉक्स आहेत. असे सांगीतल्याने आम्ही त्याना देशी दारु वाहतुक व विक्री करण्याचा परवाना बाबत विचार पुस केली असता त्याने त्यास कसलाही परवाना नसल्याचे सांगीतले आम्ही त्याचे कडे कार चालविण्याचा परवाना विचारले असता ते पण नसल्याचे सांगातले.
नायगाव पोलिसांनी 38 हजार 400 रुपयाची देशी दारु व 75 हजाराची कार जप्त केली असून बाबाराव कोंडीबी बेलकर वय 18 वर्ष व्यावसाय शेती 2. तिरुपती बाबाराव बेलकर वय 20 वर्षे यांच्या विरोधात कुंटर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुंटर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पोलिसांनी कारवाई केल्याने कुंटर पोलीसांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना पाठबळ देणारे भोसले यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



