ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कोलंबी मध्ये लोकसहभागातुन उभारला वनराई बंधारा

New Bharat Times नेटवर्क

नायगाव – तालुक्यातील कोलंबी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोकसहभाग, श्रमदान व सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून गावालगतच्या ओढ्याजवळ पाणी साठवणूकिसाठी वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. वनराई बंधारा हा एक नैतिक आणि पर्यावरणीय उपाय आहे.

ज्याच्या माध्यमातून पाणी संचयन आणि मृद संधारन साधता येते. यामुळे पाणी प्रश्नाचा सामना करण्यास मदत होते. पाणी वाचवा, पाणी साठवा या संकल्पनेतून गावाकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे वनराई बंधारा उभारण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कोलंबी येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारा उभारला हे विशेष.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कृषी सहायक, गावातील सर्व विभागाचे कर्मचारी, नागरिक, महिला – पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker