ताज्या बातम्यानागपूरमहाराष्ट्र

​आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांची उपोषण स्थळी भेट ; आंदोलकांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन

New Bharat Times नेटवर्क

​नागपूर : येथील यशवंत स्टेडियम येथे आपल्या विविध मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज भेट दिली.

यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. ​यावेळी बोलताना आमदार म्हणाले की, “तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे. मी संबंधित मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी या विषयावर तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन.

​आमदारांनी आंदोलकांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपोषण कर्त्या राज्य अध्यक्ष स्नेहल कांतीलाल पटेल, राज्यसचिव हनुमंत इंगोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रकाश महिपाळे, विश्वास शेटे, उमरान पठाण, विनोद बनसोडे, इक्बाल शेख, परभणी जिल्हाध्यक्ष आगाव व राज्य कोर कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष सोबतच राज्यातील जवळपास तालुका व जिल्हा व्यवस्थापक हे उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker