बरबड्यात डोअर स्टेप बँकिंग सेवेचा अभाव : पोस्ट कर्मचाऱ्याचा सेवेला नकार : ग्राहकाशी मुजोर पद्धतीने वागणूक

New Bharat Times नेटवर्क
बरबडा : भारत सरकारच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे सुरू करण्यात आलेल्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घरीच बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे. मात्र, नायगाव तालुक्यातील बरबडा या ठिकाणी या सेवेचं सर्रास उल्लंघन केले जात आहे. शिवाय ग्राहकांची मुजोर पद्धतीने वागणूकही दिली जात असल्याने पोस्ट ऑफिस कर्मचारी विरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावातील एका स्थानिक रहिवाशाने महिला पोस्ट कर्मचाऱ्याला त्यांच्या पत्नीचे IPPB खाते उघडण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. योगायोग संबंधित महिला कर्मचारी ही ग्राहकाच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर होती. संबंधित ग्राहकाने महिला कर्मचाऱ्याला घरी जाऊन माझ्या पत्नीचे खाते काढू.शिवाय चहापाणी देखील घेऊ असा मानपान दिला.
तथापि, संबंधित महिला कर्मचाऱ्याने घरी येण्यास नकार देत, घरी येणं होत नाही तुम्हाला जर खाते काढायचे असेल तर मी ऑटो मध्ये बसते तुम्ही तिथे तुमच्या पत्नीला घेऊन या.अशी सूचना केली. ग्राहकाने वारंवार विनंती करून देखील संबंधित महिला कर्मचाऱ्यांने मुजोर पद्धतीने त्या ग्राहकाशी वागणूक दिली. ही कृती IPPB च्या डोअरस्टेप बँकिंग सेवेच्या धोरणाच्या विरोधात आहे, ज्यामध्ये ग्राहकाच्या घरी जाऊन सेवा देणे अपेक्षित आहे.
IPPB च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, डोअरस्टेप बँकिंग सेवा हि ग्राहकाच्या निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध आहे.कोणतेही शुल्क न घेता दिली जाते.IPPB च्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरीच बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे. मात्र, अशा घटनांमुळे या सेवेच्या अंमलबजावणीसाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पोस्ट बँकिंग सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालून सदर महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.