किनाळा भिम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी पंडितराव पाटील उपाध्यक्षपदी बालाजी पाटील

मोरे मनोहर
किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजित करण्यात आले असून या नवयुवक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी पंडितराव दिगांबर पाटील मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी गावातील उपसरपंच बालाजी व्यंकटराव पाटील भोसले यांची सर्वांनुमते निवड करून जयंती मंडळाची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
दि.27 एप्रिल 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून व शांततेच्या वातावरणात भिम जयंती साजरी करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत नवयुवक भीम जयंती मंडळाची कार्यकारणी घोषित करण्यात आली या भिम जयंती मंडळाच्या उर्वरित कार्यकारणीत सचिव म्हणून संजय पाटील वाघमारे यांची निवड करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एका विशिष्ट समाजापुर्ती मर्यादित राहू नये हा दूरदृष्टी कोण डोळ्यासमोर ठेवून किनाळा येथील भीम जयंती मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजातील कर्तबगार व्यक्तींची जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी व इतर कार्यकारिणीवर निवड करून गावातील एकोपा व एकता जोपासण्याचे काम येथील भीम जयंती मंडळाच्या वतीने दरवर्षी केले जाते. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम असल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने येथील जयंती मंडळांना उत्कृष्ट भीम जयंती मंडळाचा पुरस्कारही घेऊन गौरव करण्यात आला होता.
याही वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 27 एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजित करण्यात आले असून या निमित्त सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण , यानंतर मान्यवर मंडळीचे मनोगत व दुपारी चार वाजता गावातील प्रमुख रस्त्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व सायंकाळी सात वाजता समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.