माहूरमध्ये अर्धवट जाळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

New Bharat Times नेटवर्क
माहूर : तालुक्यातील आष्टा फाट्याजवळ एका शेतकऱ्यांच्या शेतातील तुराट्यात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह दि.५ जुन रोजी रात्री सापडला. यामुळे माहूर परिसरात एकच खळबळ उडाली असून या अज्ञात महिलेचा इतरत्र खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी माहुर तालुक्यात मुत्तदेह जाळण्यात आला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती समजताच माहूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, परगेवार यांचेसह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गुरुवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि माहूर पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार माहूर पासुन ९ कि. मी. अंतरावर असलेल्या माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील मेन रोड वर असलेल्या आष्टा फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांचे मुख्य रोडपासून २०० मिटर अंतरावर शेत असून. त्यांनी शेतात शेतीला लागणारे साहित्य ठेवले होते. त्यात स्प्रिंकलरची ६१ पाईप, नौजल सह अन्य साहित्य होते. या साहित्याच्या बाजूलाच विहीरीजवळ कापसाच्या व तुरीच्या पर्हाट्या होत्या.
पण अचानक आग लागल्याचे दिसल्याने शेतकरी शेतात धाव घेतली व लागलेली आग विझवली असता विझलेल्यख राखेत अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह दिसून आला. सदरचा मृतदेह हा महिलेचा असल्याचे लक्षात येताच माहूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
मयत महिलेच्या हाता बांगड्या व पायात जोडवे आहेत पण ओळख पटण्यासारखा एकही पुरावा नसल्याने या अज्ञात महिलेच्या मारेकऱ्याचख तर शोध घेण्याचे आव्हान पोलीसापुढे आहेच पण मयत महिला कुठली आहे याचाही शोध लावण्यासाठी माहूर पोलिसांना शक्ती खर्च करावी लागणार आहे. अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.