वयोवृद्ध महिलेचा खुन करुन पावनेतीन लाखाचा ऐवज पळवला : अज्ञात आरोपीच्या विरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

New Bharat Times नेटवर्क
हिमायतनगर : तालुक्यातील टेंभुर्णी येथील वृद्ध महिलेचा खुन करुन २ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. ५ जुन रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र सदरची हत्या जवळच्याच नातेवाईकांनी केल्याची कुजबूज होत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी येथे श्रीमती गयाबाई रामजी तवर ( देवसरकर ) वय ७५ वर्ष ह्या एकट्याच राहत होत्या. त्यांना तिन मुली अपत्य असून त्यांचे लग्न झाले असल्यामुळे त्या सासरी राहतात. दरम्यान दि.३ रोजी अज्ञात व्यक्तीने गयाबाई वृद्ध महिलेचा खून करून त्यांच्या जवळीव १. ५ ग्रॅम कानातील सोन्याच्या मुद्या, २. ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोरमाळ, ३. १० ग्रॅम १४ पाणाचे सेवनपीस असे एकूण २३ ग्रॅम वजनाचे सोने किंमत १ लाख ८४ हजार नगदी रक्कम ९० हजार असा एकूण २ लाख ७४ हजार रुपये असा ऐवज लंपास केला.
या घटनेप्रकरणी प्रथमतः हिमायतनगर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू मयताच्या अंगावरील जखमा मारहाण करण्यात आलेल्या खुना आढळून आल्या असल्याने घातपाताचा संशय करण्यात आला. त्यामुळे रविवार दि.७ रोजी मयताचा जावई किशनराव दतराव वानखेडे वय ४३’वर्ष रा.टाकळी ता. उमरखेड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत हे करीत आहेत.