कोटग्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर शामंते यांचे कुंडलवाडी येथे विविध प्रश्ना संदर्भात आमरण उपोषण सुरू

कुंडलवाडी :- येथून जवळच असलेल्या कोटग्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर शामंते यांनी आज दि. 21 जुलै रोजी चुंगी नाका येथे कुंडलवाडी शहर व परिसरातील विविध प्रश्ना संदर्भात आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास कुंडलवाडी शहर व परिसरातील अनेक नागरिकांसह विविध सामाजिक संघटना तसेच दौलापूर, कोटग्याळ, माचनूर, गंजगाव व हुनगुंदा गावातील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शंकर शामंते यांनी कुंडलवाडी परिसरातील विकासासाठीच्या 9 मागण्या सोडवण्याच्या साठी हे उपोषण सुरू केले आहे. यात कुंडलवाडी ते माचनूर ७ किमी रस्त्याची दुरुस्ती करून कोटग्याळ ते माचनुर नाल्यावर तात्काळ पुल बांधण्यात यावी. डौर येथिल तलावाचे पाणी साठवण क्षमते पेक्षा मोठ्या प्रमाणात येत आसुन शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासकीय मुल्याकंनानुसार भरपाई द्यावी.कुंडलवाडी पासुन २ किमी वर असलेल्या तीस वर्षा पुर्वीचा लाल कुंटा तलाव फुटून होणाऱ्या नुकसाणीची मदत द्यावी.
कुंडलवाडी व परिसरातील नागरिकांना पुरक व्यवसाय करण्याच्या अनुशंगाने एक मिनी एम.आय.डी.सी. उभारावी. बिलोली तालुक्यातील शासकीय परवाणाधारका कडून विक्री होत असलेल्या रसायण मिश्रीत ताडी व शिंदी ची रितसर चौकशी करून यावर बंदी घालावी. बिलोली तालुक्यातील रेतीचे ठेके असलेल्या गावच्या रस्त्याची ओव्होर लोड वाहणामुळ रस्त्याची दयनिय आवस्था होत आहेत सदरील वाहणांची मर्यादा तपासुन दंडात्मक कारवाई करावी. डौर फाटा ते (आरळी- कुंडलवाडी) रस्ता सि. सी करण्यात यावा.
कुंडलवाडी ते हुनगुंदा सि. सी. रस्ता करावी.कोटग्याळ ते वलियाबाद चा रस्ता डांबरीकरण करावी. या मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शंकर शामंते यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी भेट देऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे.



