ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर : नरसीत चक्काजाम

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे कामे करण्यात यावी यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असून. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी गुरुवारी रस्त्यावर उतरले. गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात नरसी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नायगाव तालुक्यातील नरसी चौकात प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरले.

प्रहारचे गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन गुरुवारी करण्यात आले. यावेळी हिंद युवा परिषदेचे अध्यक्ष रणजीत देशाई, हानमत शिदे, श्रीराम पवार, गणेश पा.हांडे, मारोती मगरुळे, शंकर आचेवाड, उमाकांत बादेवाड, दिगंबर रामतीर्थकर, गोपिनाथ सांगवीकर, राजेश बेळगे, बादेवाड साहेब, साईनाथ बोईनवाड, विनोद हाचगुडे, शेतकरी तालुकाध्यक्ष नायगाव अंंगद मुदखेडे, शिवलिंग माटोरे, चादु आंबटवाड.

रामदास भाकरे, माधव कोसबे, शांताबाई चितले, मधुकर पाटील, एकनाथ संत्रे, मिलिंद कागडे, श्रीराम गाडले, मौला शेख, भगवान गायकवाड, विठ्ठल बोरीकर, साईनाथ इबितवार, शेख मुजाहिद, माधव कुडके, मैनोदिन शेख, खाकिबा सुर्यवंशी, बाळासाहेब डाकोरे, सेषेराव पांचाळ, मिलिंद वाजरे, संदिप कदम, संतोष कदम, बालाजी भुरेवार, बळीराम मुगावकर, भगवान जाकापुरे यांच्याबरोबर नायगाव, बिलोली, धर्माबाद, उमरी तालुक्यातील मोठ्या संख्येने सर्व शेतकरी दिव्यांग निराधार ज्येष्ठ बांधव व सामान्य जनता विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चक्काजाम आंदोलनादरम्यान लांबच लांब वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker