कत्तल करण्यासाठी 26 जनावरे ट्रक मध्ये घेऊन जाणाऱ्या 2 आरोपीना 6 दिवसाची पोलिस कोठडी
◆ बिलोली येथील न्यायालयाचे आदेश

कुंडलवाडी :- कुंडलवाडी-धर्माबाद रोडवरील शेळगांव (थडी) येये दि. ७ जुलै रोजी कुंडलवाडी पोलिसांनी पाठलाग करुन कत्तलीसाठी २६ जणावरे ट्रक मध्ये तेंलगाण्याकडे नेत असताना दोन आरोपी रशीद मोहमंद करीमोदीन रा.इस्लामपुर तहसिल मालपुर जिल्हा टौंक राजस्थान, खयुम जुम्माखान वय ३६ रा.राजस्थान या दोनआरोपीना बिलोलीच्या न्यायालया पुढे उभे केले असता न्या विशाल घोरपडे यांनी सहा दिवसाची पोिलस कोठडी सुनावली असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.

ट्रक क्र. एम.पी.एच.डी.७६८० च्या ट्रक मधुन एकुण 26 गोवंश जातीच्या जनावरांना गुंगीचे औषधीने बेहोश करुन देारीने बांधुन निर्दयीरित्या व क्रुरपणे कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन कुंडलवाडी पोलिसांनी कुंडलवाडी-धर्माबाद रोड वरील शेळगांव (थडी) येथे ट्रकचा पाठलाग करुन ट्रकला पकडून सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी दोन आरोपीतांना ताब्यात घेऊन गु.रन १२६/२०२५ कलम(२),३.(५) भारतीय न्या संहिता व सहकलम ९,११ (क)११,(ग),११(च) प्राण्यानां कु्ररपने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व सहकलम ५(अ) (१),५(अ) (२),११ म्हाराष्ट्र प्राणि सरंक्षण अधिनियम अन्वेय कुंडलवाडी ठाण्यात गुन्हयाची नोंद करुन पुढील तपास पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराव धरणे पोलिस उपाधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलिस कर्मचारी गफूर शेख, नागेंद्र कांबळे, शेषेराव खानपटे, रघूविरसिंह चौहान, अमर शिंदे, शिवराज गंगूलवार, आनंद बोडके, मिर्झा फेयाजबेग हे तपास करित आहेत.

गेल्या अनेक दिवसापासुन कुंडलवाडी ते तेंलगाण्याकडे नागनी मार्गै व धर्माबाद मार्गे तेंलगाण्यात गोवंशीची तस्करी होत असल्याची पाळत ठेवून कार्यवाही केल्याने पोलिसांच्या कार्यवाहीचे नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.



