ताज्या बातम्याबिलोलीमहाराष्ट्र

कुंडलवाडी नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेदवार रिंगणात

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज मागे घेतले नसून नगराध्यक्ष पदासाठी ४ जण तर नगरसेवक पदासाठी ७७ वैध नामनिर्देशन पत्रातून १० जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सदस्य पदासाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विपिन पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक मोरे यांनी दिली आहे.

कुंडलवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉ.विठ्ठल चिनन्ना कुडमुलवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), डॉ.सायन्ना शेंगूलवार(शिवसेना शिंदे गट) व प्रणिता गजानन कोटलावार(भाजप),पठाण नजीरमियाँ मौलाना (अपक्ष) हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी महायुतीतीलच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत होणार आहे.

प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक याप्रमाणे १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून येणार आहेत. १० प्रभागात ६०२६ पुरुष,६१३५ स्त्री व २ इतर असे एकुण १२१६३ मतदार शहरातील १८ मतदान केंद्रावर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहे. दि.२ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतदान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker