नायगांव पत्रकार संघाने पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांना वाहिली श्रद्धांजली

नायगाव : नुकत्याच एका दुर्दैवी अपघातात निधन झालेले नायगांव येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद विठ्ठलराव चन्नावार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल नरसी येथील शासकीय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी दिवंगत पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दै एकजुटचे तालुका प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार यांचे दि २४ ऑगस्ट रोजी नायगांव येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल दि ५ सप्टेंबर रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत दिवंगत रामप्रसाद चन्नावार यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही भरून न निघणारी क्षती असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेस नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, गंगाधर पा भिलवंडे, लक्ष्मण बरगे, रघुनाथ सोनकांबळे, दिलीप वाघमारे, सय्यद जाफर, विकास भुरे, माधव पा चव्हाण, शेषेराव कंधारे, गंगाधर गंगासागरे, मनोहर मोरे, प्रकाश महिपाळे, अनिल कांबळे, देविदास सूर्यवंशी, शेख आरिफ, धम्मानंद भद्रे, शाम गायकवाड, हाणमंत वाडेकर, दिगंबर झुबांडे, परमेश्वर जाधव, बालाजी हनमंते, शेषेराव बेलकर, सय्यद अजिम, किरण वाघमारे, बळवंत मोरे यांच्या सह नायगांव तालुक्यातील अनेक कार्यरत पत्रकारांनी उपस्थित राहून आपली शोकभावना व्यक्त केली.



